पालकमंत्री ना सतेज पाटील यांच्या कडून कागणीतील नुकसानीची पाहणी - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2020

पालकमंत्री ना सतेज पाटील यांच्या कडून कागणीतील नुकसानीची पाहणी

 

अतिवृष्टी, महापूर बाधीत दौऱ्यात कागणी येथे मार्गदर्शन करताना पालकमंत्री ना सतेज पाटील व मान्यवर.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

     पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील  यांच्या चंदगड मधील किणीकर्यात भागातील अतिवृष्टी व पूरग्रस्त दौऱ्यादरम्यान कागणी गावातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी कागणी येथे थांबून अतिवृष्टी,महापूर, कोरोना रोगराई  यावर  ग्रामस्थांना मान्यवरानी   मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजी शिरोलीकर, जि.प.सदस्य विद्याधर गुरबे व अरुण सुतार, बी.डी.ओ.चंद्रकांत बोडरे, सावळगी, सहाय्यक गट विकास अधिकारी जाधव, नगरसेवक किरण कांबळे, जे. के.पाटील,  सरपंच सुप्रिया कांबळे, उपसरपंच रामचंद्र देसाई व सर्व सदस्य, ग्रामसेवक बाळासाहेब खवरे, पोलीस पाटील अमृतराव देसाई,  तलाठी कांबळे, माजी उपसरपंच जनार्दन देसाई तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत गुंडोपंत देसाई व आभार सागर खाडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment