शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गाळप झालेल्या ऊसाला एफ आर पी पेक्षा दर देणार-खोराटे, दौलत-अथर्व सहा लाख टन उस गाळप करणार - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2020

शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गाळप झालेल्या ऊसाला एफ आर पी पेक्षा दर देणार-खोराटे, दौलत-अथर्व सहा लाख टन उस गाळप करणार

दौलत -अथर्वच्या दूसऱ्या गळीत हंगामास सुरवात

दौलत-अथर्वच्या सन २०-२१ या हंगामाचा शुभारंभ ऊस मोळी गव्हाणीत टाकून करताना अध्यक्ष मानसिंग खोराटे, मनिषा खोरोटे, भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, अशोक जाधव,  पृथ्वीराज खोराटे आदी. 

 चंदगड / प्रतिनिधी

     दौलत कारखाना हा चंदगड च्या शेतकऱ्यांची खरीखुरी दौलत आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी विश्वास टाकून ऊस दिला. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून ऊस बिले वेळेत आदा केली .या वर्षी ही शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गाळप झालेल्या ऊसाला एफआरपी पेक्षाही जादा दर देणार असल्याचे अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले. 

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत - अथर्वच्या सन 2020-21 गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सुरवातीला काटापूजन विष्णू गावडे व प्राजक्ता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

       प्रारंभी प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश ज्योती यानी करून मागील वर्षी शेतकऱ्यांनी विश्वास टाकून ऊस दिला. पण तांत्रिक अडचणीमुळे जादा गाळप करता आले नाही. यावर्षी सहा लाखापेक्षा जादा ऊस गाळप करू असा विश्वास व्यक्त केला.

          यावेळी गोपाळराव पाटील``बंद दौलत सुरू करून अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यानी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. कामगारही आपला कारखeना समजून जीव ओतून काम करून दौलतला गतवैभव प्राप्त करून देतील असे सांगितले.

     माजी मंत्री भरमुआण्णा पाटील म्हणाले, ``तालुक्यातील शेतकरी व कामगारांचा विश्वास मानसिंग खोराटे यांनी संपादन केल्याने दौलतला मोठ्या प्रमाणात ऊस ऊपलब्ध होणार आहे. 

       डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी सहाकारातील सर्व कारखाने   राजकीय लोकांनी गिळकृंत केले आहेत. १९९८साली सहकारात  ५४ टक्के व खाजगी क्षेत्रातून ४६ टक्के साखर उत्पादन होत होती. मात्र  सहकारातील सर्व कारखाने   राजकीय लोकांनी गिळकृंत केल्याने सहकारच धोक्यात आला आहे. गुजरातमध्ये प्रति टन ऊसाला चार हजार रूपये दर मिळतो, मग महाराष्ट्रात का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 ॲड. संतोष मळवीकर, विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील, अशोक जाधव, प्रा एन. एस. पाटील, गोपाळ ओऊळकर  यांनी मनोगत व्यक्त केली. 

   यावेळी आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष अशोक चराटी, अजय देसाई, संजय पाटील, मष्णु सुतार, मल्लीकार्जुन मुगेरी, उपनगराध्यक्ष विलास नाईक, दशरथ अमृते, तुकाराम बेनके, शिवाजी सावंत, उदयकुमार देशपांडे, मनिषा खोरोटे, पृथ्वीराज खोराटे, राजू देसाई , जनरल मॅनेजर (टेक्नीकल) एम. भंडारे, चिफ केमिस्ट अजित सांळुखे, मुख्य शेती अधिकारी, डे. जनरल मॅनेजर (पॉवर) आदीसह शेतकरी, तोडणी वहातूकदारसर्व खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. व्यंकोजी कोलकार यांनी केले तर आभार विष्णू गावडे यांनी मानले.



No comments:

Post a Comment