इको केन साडे पाच लाख टन ऊस गाळप करणार, १४ व्या गळीत हंगामाला सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

19 October 2020

इको केन साडे पाच लाख टन ऊस गाळप करणार, १४ व्या गळीत हंगामाला सुरवात

म्हाळुगे खालसा (ता. चंदगड) येथील कारखान्याच्या गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीताचा शुभारंभ करताना व्ही. एस. देसाई, व्ही. टी. कुलकर्णी, प्रभाकर हूलजी, बाबासाहेब देसाई आदी.

चंदगड / प्रतिनिधी
 चंदगड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या  कारखान्यामुळे चंदगड तालुक्यासह खानापूर ,बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या उसाचे गाळप वेळेत करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.त्यामूळे व्यवस्थापनाने   साडेपाच लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे . तालुक्यातील अन्य साखर कारखान्याच्या बरोबरीने शेतकऱ्यांना दर देणार आहे .त्यामळे  शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस इको केन कारखान्याला पाटवून सहकार्य करावे असे आवाहन करून कोरोना महामारीमुळे कारखाना सूरू करण्यात  अनेक अडचणी आल्या आहेत .मात्र शेतकरी व कामगारांच्या विश्वासावर या अडचणीवर मात करत गळीत हंगाम सुरू करण्यात आल्याचे मत जनरल मॅनेजर व्ही . एस . देसाई यांनी व्यक्त केले .ते  म्हाळूंगे खालसा ता चंदगड येथील इको केन शुगर लि  या साखर कारखान्याचा १४ व्या गळीत हंगाम शूभारंभप्रसंगी बोलत होते.   जनरल मॅनेजर व्ही . एस . देसाई , प्रेसिडेंट व केनहेड व्ही . टी . कुलकर्णी यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला
        यावेळी डी . आर . हुक्केरी , नामदेव पाटील , मॅनेजर प्रभाकर हुलजी , बाबासाहेब देसाई , पांडुरंग गावडे , श्रीधर मोहिते , जिल्हा बॅंकेचे अनिल खोराटे यासह शेतकरी, कामगार, तोडणी वहातूक दार उपस्थित होते.



 

No comments:

Post a Comment