सेंद्रीय खताचा पुरेसा वापर करुन मातीचे आरोग्य अबाधित ठेवा - एस. बी. माने-पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2020

सेंद्रीय खताचा पुरेसा वापर करुन मातीचे आरोग्य अबाधित ठेवा - एस. बी. माने-पाटील

तुर्केवाडी येथे  ओलम (हेमरस) तर्फे  'शेतकरी आर्थिक साक्षरता' कार्यक्रम

तुर्केवाडी येथे  ओलम (हेमरस) तर्फे  'शेतकरी आर्थिक साक्षरता' कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर. 

चंदगड / प्रतिनिधी नंदकुमार ढेरे

              पर्यावरण पुरक ऊसशेती व एकरी ऊस उत्पादनवाढ, पीक लागवड नियोजन, आर्थिक ताळेबंद याबाबत माहिती देणारा ओलम (हेमरस) साखर कारखान्याचा 'शेतकरी आर्थिक साक्षरता' कार्यक्रम तुर्केवाडीत सोशल डिस्टन्सचा वापर करुन सुरळीत पार पडला. ओलमचे.जोतिबा पाटील यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला, तर  यल्लापा पाटील यानी प्रास्ताविकात  ओलम शेतकऱ्यासाठी राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. 

              प्रथम सत्रात व्ही एस आय चे माजी ऊस शास्त्रज्ञ व ओलमचे ऊस पीक सल्लागार एस.बी माने पाटील यांनी शेतकऱ्यांना विक्रमी ऊसपीक घेण्यासाठी कमी खर्चात एकरी ऊस उत्पादन कसे वाढविता येईल यासाठी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी कमी खर्चाच्या बाबींचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यासाठी ऊस रोप लागण पदधतीचा जास्तीत जास्त वापर करावा, बियाणे वापराच्या पारपारिक पदाघतीतील दोष दूर करुन रुद सरी पदधतीचा अवलंब करावा, संतुलित खतांचा वापर करत असताना सुध्दा सेंद्रीय खताचा पुरेसा वापर करुन मातीचे आरोग्य अबाधित ठेवावे, एकरी उत्पादन वाढवून शेतकऱ्यांच्या संसारात आर्थिक सुबत्ता कशी आणता येईल याबाबत मुददेसुद विवेचन केले प्रश्नोत्तराच्या तासात शेतकऱ्याच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे देऊन शकाचे निरसनही केले.दुसऱ्या सत्रात  माने पाटील यानी शेतकन्यानी पिकवलेल्या ऊस पिकाचा आर्थिक ताळेबंद कसा ठेवावा व दिवसेदिवस ऊस पिकाचा वाढता खर्च आणि एकरी उत्पादन यांचा ताळमेळ घालण्यासाठी सेंद्रीय खताचा, हिरवळीच्या खताचा वापर करावा ऊस वाढीच्या अवस्था आणि ऊसाचा एकूण कालावधी याचा शास्त्रीय दृष्टीने विचार केला तर ऊस पिकाशी स्पर्धा न करणारे आतरपीक घेणे हे कसे आर्थिक फायदेशिर ठरते तसेच जेथे फेरपालट न करता ऊसाचे पीक घेतले जाते अशा जमीनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी हिरवळीचे खत पीक घेणे व कमी कालावधीचे व्दिदलवर्गीय आंतरपीक घेणे कसे गरजेचे आहे याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. 

           सॉलिडेरिडचे समन्वयक श्री. युवराज चव्हाण यानी शेतकरी आर्थिक साक्षरते बाबत समजावून सांगताना शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी वापरलेल्या निविष्ठा, मजूर, तण नियंत्रण ते ऊसपीक गाळपापर्यंतचा खर्च याचा ताळेबद ठेवला तर शेतकरी कशाप्रकारे आर्थिक साक्षर होऊन बचत करु शकतो हे 'व्हिडीओ शो'च्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले. सरपंच रुद्राप्पा तेली, प्रगतशील शेतकरी महादेव निवगिरे, महादेव दोरुगडे, ज्ञानेश्वर आवडण, जानबा चौगुले, संजय पाटील, जोतिबा तोराळकर, महादेव गावडे, बाबु गावडे, अनंत गावडे शंकर धूडुम, संजय गावडे, तानाजी चौगुले, राहुल तोराळकर, यल्लुपा धूडूम यांचेसह तुर्केवाडी, माडवळे गावातील प्रगतशील शेतकरी सोशल डिस्टन्सचा वापर करुन आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी ओलमच्या वेळेतऊस बील देण्याच्या व पारदर्शक व्यवहार याचे कौतुक करून या प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.संवादातून शेतकऱ्याच्या ऊस पीकाच्या समस्येचे निराकरण होत असल्याने त्यांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम सुरळित पार पाडण्यासाठी ओलमचे शेती अधिकारी  सुधीर पाटील व बिझनेस हे  भरत कुडल यांचे मार्गदर्शन व ऊस विभागातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. विठठल सुतार यांनी आभार मानले.
No comments:

Post a Comment