अजित गणाचारी यांची चतुर्थश्रेणी जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

09 October 2020

अजित गणाचारी यांची चतुर्थश्रेणी जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

अजित गणाचारी

तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा

      श्री शिवशक्ती हायस्कूल व न्यूनिअर कॉलेज अडकूर ( ता. चंदगड ) येथील अजित पांडूरंग गणाचारी यांची महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना कोल्हापर जिल्हाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

      कोल्हापर जिल्हयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या राज्य कमिटी समोर मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना अजित गणाचारी यानी सांगितले . या निवडीबद्दल आमदार राजेश पाटील, प्राचार्य एस .जी. पाटील व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी श्री. गणाचारी यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment