राजगोळी बुद्रुकचे दत्तू भरमू पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2020

राजगोळी बुद्रुकचे दत्तू भरमू पाटील यांचे निधन

 

 कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील दत्तू भरमू पाटील (वय 105) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी दि. 11 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दड्डी (ता. हुक्केरी) येथील हॉटेल व्यवसायिक पांडुरंग पाटील यांचे ते वडील होते. कोवाड येथील श्रीदत्त प्रिंटिंग प्रेसचे मालक व राजगोळी बुद्रुक येथील श्री दत्त हायस्कूलचे संस्थापक बी. के. पाटील, ब्रम्हलिंग सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नारायण पाटील, दत्त हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद पाटील यांचे ते काका होते. राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेच्या गडहिंग्लज विभागाचे समन्वय अधिकारी व बेळगाव येथील एसराज टूर अँड ट्रॅव्हल्स हॉलिडे पॅकेजीसचे मालक राजू पाटील यांचे ते आजोबा होते.No comments:

Post a Comment