चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात ' राष्ट्रीय शिक्षण दिवस' या कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर. |
चंदगड / प्रतिनिधी
भारतामध्ये सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, दीन-दलित, गरीब व अल्पसंख्याक समाजाला शिक्षण मिळाले पाहिजे. निरक्षरता हा भविष्यातील युवा पीढीला गुलामी चा शाप ठरणार आहे, त्यासाठी युवकांनी स्वतः शिकून आपल्या परिवार व समाजाला साक्षर बनविले पाहिजे असे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी प्रा संजय पाटील यांनी केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त संपन्न ' राष्ट्रीय शिक्षण दिवस' या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
प्रारंभी डाॅ पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. प्रास्ताविक प्रा. सौ. दिवेकर यांनी केले. प्रा. पाटील पुढे म्हणाले की मौलाना आझादांनी त्यावेळीच संपूर्ण साक्षरतेचे स्वप्न पाहिले होते. भारताला समृद्ध व सक्षम बनवायचे असेल, स्वतःच्या हक्क व अधिकारांची ओळख करून घ्यायची असेल तर तळागाळातील प्रत्येक माणूस शिकला पाहिजे. शिक्षण कोण्या एका वर्गाची मक्तेदारी नसून ती सार्वजनिक संपत्ती आहे, आणि ती सर्वांना मिळालीच पाहिजे, अन्यतः आपण पुन्हा गुलामीच्या खाईत लोटले जाऊ.अशी त्यांची इच्छा होती. काळ सोकावतो आहे, वेळीच सावध पवित्रा घ्या, युवकांनो शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. शिका संघटित व्हा व अन्याय, भ्रष्टाचार व निरक्षरतेला दूर सारा. आपण यावेळी अशी शपथ घेवूया की 'मी किमान एका तरी व्यक्तीस साक्षर बनविन.' हीच खरी आझादानां आदरांजली ठरेल. याप्रसंगी महाविद्यालयाचा सर्व स्टाफ व NSS चे स्वयंसेवक उपस्थित होते. पी. पी. धुरी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment