चंदगड शहराच्या विकासासाठी १ कोटी ९९ हजार १४२ रुपयांचा निधी मंजूर - नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2020

चंदगड शहराच्या विकासासाठी १ कोटी ९९ हजार १४२ रुपयांचा निधी मंजूर - नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर

                                                        नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड नगरपंचायतीमार्फत चंदगड शहराच्या विकासासाठी  रस्ते खडीकरण, डांबरीकरण व गटर्स बांधकामाला १ कोटी ९९ हजार १४२ रुपयांचा निधी विविध फंडातून मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.  प्राची दयानंद काणेकर यांनी दिली. 

      मंजूर कामे व निधी पुढील प्रमाणे :- कुंभार वसाहत काशिम नाईक ते नदाफ घरापर्यंतचा रस्ता खडीकरणासह डांबरीकरण करणे (२.३५ लाख), नवीन वसाहतील मारूती देसाई ते महसूल भवन रस्ता खडीकरणासह डांबरीकरण करणे (४.६३ लाख), ब्रम्हदेवनगर धाटोंबो घर ते पेडणेकर घर रस्ताखडीकरणासह डांबरीकरण करणे (३.७८ लाख), कुंभार वसाहत मैनुद्दीन नाईकवाडी ते शेटीन नगराध्यक्षा प्राची पठाण रस्ता काणेकर यांची खडीकरणासह माहिती डांबरीकरण करणे (२.१८ लाख), शिवाजी गल्ली बाबूराव हळदणकर घर ते नारायण येडवे दोन्हीबाजू रस्ता खडीकरणासह डांबरीकरण करणे (५.७९ लाख) तर प्रथमेशनगर हिंडगाव रोड ते विनायक काजू फॅक्टरी पर्यंत वाढीव पाईपालाईन (२.६६ लाख), आंबेडकर नगर रस्ता व गटर्स बांधकाम करणे (५० लाख) गांधीनगर नारायण गायकवाड ते राजाराम कुंभार आरसीसी गटर्स बांधकाम (८.५३ लाख), चंद्रसेन गल्ली बुरूडचाळ ते गुरुवारपेठ मेन रस्ता (३.८३ लाख), चाळोबा मंदिर ते रवळनाथ विद्यालय रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (४.७५ लाख), विनायकनगर चौगुले घर ते शिरूर क्रॉस रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (१.५५ लाख), उल्हासनगर दीपक पाटील ते अल्लीसाब नाईक पर्यंतचा रस्ता खडीकरणासह डांबरीकरण करणे (४.३० लाख), लक्ष्मीनगर ते आझादनगर रस्ता खडीकरणासह डांबरीकरण करणे (६.५ ९ लाख)     अशी एकूण  १ कोटी ९९ हजार १४२ रूपयांची कामे मंजूर झाली आहेत. लवकरच या कामांना सुरूवात होणार असल्याचे नगराध्यक्षा काणेकर यांनी सांगितले.




No comments:

Post a Comment