चंदगडला सोमवार पासून मिळणार शालेय विद्यार्थ्यांना पास - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2020

चंदगडला सोमवार पासून मिळणार शालेय विद्यार्थ्यांना पास

चंदगड / प्रतिनिधी

      चंदगड तालुक्यातील ९वी ते१२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोमवार दि. २१/१२/२०२०पासून सवलतीच्या दरात पास वितरण करणार असल्याची माहिती आगारप्रमुख गौतम गाडवे यांनी दिली. 

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दहा महिने शाळा बंद असल्याने पर्यायाने विद्यार्थ्यांची पास सवलत बंद होती,पण गेल्या पंधरा दिवसांपासून शाळा सुरू झाल्या आहेत. पण चंदगड आगारातून विद्यार्थ्यांना सवलतीचा पास मिळत नव्हते,त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून शाळेला जावे लागत आहे.परिणामी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तालूक्यातील विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पास देण्याची मागणी चंदगड आगाराकडे केली होती. त्यानूसार चंदगड आगारातून सोमवार पासून ज्या रस्त्यावर बस फेऱ्या सुरू आहेत. फक्त त्याच भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना पास वितरण करणार असल्याची माहिती आगारप्रमुख गौतम गाडवे यानी दिली.No comments:

Post a Comment