काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने तालुक्यात पाच ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन, पालकमंत्र्याच्या हस्ते होणार शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2020

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने तालुक्यात पाच ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन, पालकमंत्र्याच्या हस्ते होणार शुभारंभ
चंदगड / प्रतिनिधी

         जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20/ 12/ 2020 चंदगड, पाटणे फाटा, हेरे, कागणी व अडकूर या पाच ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याची माहीती काँग्रसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी दिली. 
      चंदगड ग्रामीण रुग्णांलयात रविवारी  सकाळी १० ते दुपारी 5 दरम्यान  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. या उपक्रमास सकाळी १० वाजता पालकमंत्री यांच्या हस्ते प्रारंभ होईल.  सद्यस्थिती पाहता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी केले.


No comments:

Post a Comment