११ / १२ चा शासन निर्णय त्वरित मागे घ्या शालेय. शिक्षण विभागाने दि. 11/12/2020 रोजी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिपायांची पदे सेवानिवृत्त झाल्यानंतर रद्द होतील असा शासन निर्णय घेतला आहे. हा शासन निर्णय त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी चंदगडच्या तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करून चंदगडचे तहसिलदार रणवरे, चंदगड तालुका पं. स. शिक्षण विभागाच्या प्रमुख गट शिक्षणाधिकारी सौ. सुभेदार यांना निवेदन दिले. या प्रसंगी चंदगड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य आर. आय. पाटील, माजी सचिव व विद्यमान संचालक प्राचार्य वाय. व्ही. कांबळे, चतुर्थ कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष, अजित गणाचारी, चंदगड तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष, आप्पाना वैजू चिंचणगी, कार्याध्यक्ष दत्तात्रय शिवाजी मणगुतकर, उपाध्यक्ष कुंदन विठोबा पाटील, सचिव परशराम भरमा पाटील, सहसचिव चाळोबा कामत, खजिनदार तानाजी मष्णू पाटील, सदस्य अशोक विठोबा बेनके, बाळू यल्लापा नाईक सह विविध शाळा मधून आलेले सर्व चतुर्थ कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य आर. आय. पाटील व प्राचार्य वाय. व्ही. कांबळे यांनी चंदगड तालूका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने ११ / १२ / २०२०च्या या शासन निर्णयाचा जाहीर निषेध करून चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला व हा लढा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
19 December 2020
Home
chandgad
शिपाई पद रद्द करण्याचा शासन निर्णय मागे घ्यावा - मुख्याध्यापक संघटना, तहसिलदारांना निवेदन
No comments:
Post a Comment