सरोळीचे सरपंच मारूती पाटील यांना राज्य उत्कृष्ठ राजकीय कार्यक्षेत्र पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2020

सरोळीचे सरपंच मारूती पाटील यांना राज्य उत्कृष्ठ राजकीय कार्यक्षेत्र पुरस्कार

                                        मारूती राणबा पाटील 

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

       सरोळी (ता. गडहिंग्लज) येथील युवा सरपंच मारूती राणबा पाटील यांना राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती इंचकरंजी यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ठ राजकीय कार्यक्षेत्र पुरस्कार जाहिर झाला आहे.
    नेसरी परिसरातील एक अभ्यासू व धडाडीचे सरपंच म्हणून  मारूती पाटील यांच्याकडे पाहिले जाते. विविध विकासकामे खेचून आणण्याबरोबरच लॉक डाऊन  काळात उल्लेखनिय कार्य केल्यामुळे श्री पाटील यांची या पुरस्कारासाठी नियड करण्यात आली आहे. मारूती पाटील यानी विविध कंपन्यांच्या माध्यमातून कोवाड परिसरातील सर्व गावामध्ये पुरग्रस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. कोवाड येथील चर्मकार समाजाला घर बांधणीसाठी सहकार्य केले. फॉग मशिनचे वाटप तसेच कोरोणा काळात गावात योग्य नियोजन केले. यामुळे त्यांची सरपंच संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधीपदी निवड झाली आहे. दि. २५ रोजी या पुरस्काराचे वितरण जेष्ठ अभिनेते अरूण नलवडे यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्काराबद्दल सरपंच मारूती पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment