कागणी : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड -बेळगाव या वेंगुर्ला महामार्गावर ख हिंडगाव (ता. चंदगड) येथील रुकमाना भिमाना फाटक व गुंडू भिमाना फाटक यांच्या बैलगाडीला पाठीमागून क्रुझर ची धडक बसून एक बैल निकामी झाला. सदर घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता हिंडलगा येथे महामार्गावर घडली. रुकमांना व गुंडू हे दोघे सख्खे भाऊ बेळगाव येथे बांबू विक्रीसाठी गेले होते. रात्री दहा वाजता बेळगावहून चंदगडच्या दिशेने येत असताना पाठीमागून येणाऱ्या क्रू झर ने जोराने उजव्या बाजूच्या बैलाला धडक दीली. यात बैलाला मुक्का मार लागला असून बैल निकामी झाला आहे. सदर क्रूझर चालक देवरवाडी येथील असल्याचे समजते. उपस्थित बघ्यांनी त्या ड्रायव्हरला चोप दिला. यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. क्रुझर ची धडक इतकी होती हे समोरील बैलांच्या मानेवरील जु मोडून दोन तुकडे झाले तर रुकमाणा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.
सदर क्रू झर ही बेळगावहून शिनोळी येथील प्रिन्स पाईप कंपनीचे कर्मचारी घेऊन चंदगड च्या दिशेने येत असताना पाठीमागून बैलगाडीला पाठीमागून धडक दिली.
No comments:
Post a Comment