निटुर येथे मळणी काढणाऱ्यांवर मधमाशांचा हल्ला, एका पुरुषासह पाच महिला जखमी, कोवाड आरोग्य केंद्रात उपचार - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

निटुर येथे मळणी काढणाऱ्यांवर मधमाशांचा हल्ला, एका पुरुषासह पाच महिला जखमी, कोवाड आरोग्य केंद्रात उपचार

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

     येथूनच जवळ असलेल्या निट्टूर (ता. चंदगड) येथे मळणी काढण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थावर मधमाश्यानी हल्ला केल्याने एक पुरुष आणि पाच महिला जखमी झाल्या. या सर्वावर कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
         निट्टूर येथील जवळपास १५ स्त्री आणि पुरुष मलतवाडी गावाजवळ असणाऱ्या अंबू नावाच्या शेतात भाताची मळणी काढण्यासाठी गेले होते. शेतात जाऊन मळणीला सुरवात करण्यापूर्वीच शेतातील माकडांनी झाडावर अगोदरच असलेल्या कोंडग्या जातीच्या मधमाशांना त्रास देवून उठवले. अर्थातच संतापलेल्या मधमाशांनी मळणीसाठी आलेल्या सर्व शेतकऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. अचानक मधमाशांनी हल्ला चढवल्याने सर्वजन जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले . पुरुष ऊसात लपल्याने मधमाशांपासून बचावले. पण महिलांना पळता न आल्याने त्या या मधमाशांच्या हल्यात गंभीर जखमी झाल्या.
            यामध्ये जखमी झालेल्या माहिला पुढीलप्रमाणे -
सुप्रिया नामदेव पाटील (वय - ४२), नम्रता कल्लापा पाटील (वय-३३), अनुसया नरसू पाटील (वय - ६५) या सर्वावर प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड येथे उपचार करण्यात आले. शालन भैरू पाटील (वय - ४०), रेणूका शिवाजी पाटील (वय - ३१) व पुरुष विलास भैरू पाटील (वय - ४२)  यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबरोबरच डॉ. संदेश जाधव (कुदनुर) यांनीही जखमीवर उपचारासाठी मदत केली.

 

No comments:

Post a Comment