अलबादेवी येथे विना परवाना बैलगाडी शर्यत, आयोजक बैलजोडी मालकावर गुन्हे दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2021

अलबादेवी येथे विना परवाना बैलगाडी शर्यत, आयोजक बैलजोडी मालकावर गुन्हे दाखल

चंदगड / प्रतिनिधी

          अलबादेवी (ता. चंदगड) येथे विना परवाना आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यत आयोजकावर व या शर्यतीत भाग घेतलेल्या बैलजोडी मालकावर चंदगड पोलिसांनी गुन्हे दाखल केला आहे. 

          नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अलबादेवी गावाजवळ असलेल्या गावडे यांच्या काजु बागेत बैलगाडी शर्यत आयोजित केल्याची माहिती चंदगड पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक ए. बी. तळेकर यांनी घटनास्थळी फौजफाट्यासह येऊन विना परवाना बैलगाडीसाठी शर्यत आयोजक धोंडीबा दत्तु घोळसे (रा. अलबादेवी, ता. चंदगड), खादर भडगावकर (रा. आजरा), पिंटु तरवाळ (रा. तूर्केवाडी), संतु रेडेकर (रा. मुगळी), राहुल नाईक (रा. हेब्बाळ), रामलिंग गुरव (रा. कागणी), मारुती पाटील, मारुती कबाडे (दोघे रा. मलगेवाडी), रामु भोईगोंडे (रा. तेऊरवाडी), जग्गु कसळकर, पुंडलिक आंबेवाडकर, महादेव मल्हारी, सुधिर नागरदळेकर, सौदागर सुतार, प्रभाकर पाटील (सर्व रा. कूदनूर, ता.चंदगड), गंगाराम पाटील, सुधिर पाटील (दोघे रा. सांबरे, ता. गडहिंग्लज), ईश्वर गुडुळकर (रा. कुमरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), पंकज आर्दाळकर (रा. अडकुर), बाळु प्रधान (रा. जक्कनहट्टी) यासह अन्य ५ जणावर बैलजोडी व गाडीसह शर्यती मध्ये सहभागी होऊन  आपला नंबर यावा. या उद्देशाने मुक्या प्राण्यांना चाबकाने व काठीने मारहाण करुन निर्दयतेने वागणुक देवुन, शर्यत बघणे करीता जमलेल्या लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल. अशा रितीने बैलगाड्या पळवुन जिल्हाधिकारी यांनी कोरोना साथीरोगाचे अनुषंगाने निर्गमीत केले. आदेशाचा भंग करुन व पोलीसांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करुन बेकायदा बिगर परवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ [ब] सह कोविड उपाय योजना २०२० चे कलम ११ साथ रोग प्रतिंबध अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४, प्राण्यांना क्रुरतेने व निर्दयतेने वागणेस प्रतिबंध करणे बाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११ [१] [अ] प्रमाणे गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment