तुडये येथे सोमवारपासून होणार प्रकल्पदात्यासाठी जमीनीची मोजणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2021

तुडये येथे सोमवारपासून होणार प्रकल्पदात्यासाठी जमीनीची मोजणी

चंदगड / प्रतिनिधी

        तुडये (ता. चंदगड) येथील प्रकल्प दात्यांसाठी सोमवार दि ४ जानेवारीपासून चंदगड येथील उपअधीक्षक भूमीअधिलेख कार्यालय यांच्याकडून प्रकल्प दात्यांसाठी जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. मोजणी वेळी प्रकल्पदात्या शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय पाटील यांनी केले आहे. प्रकल्प दात्यांना जमीन मिळावी यासाठी जनआंदोलन, उपोषण तसेच मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता. त्यामुळे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग, कोल्हापूर यांनी चंदगड उपअधीक्षक भूमी अधिलेख यांना तुडये गट नं.  ६७ ९ व गट नं. ६९१ चा जुना गट नं. ३३१ व ३१७ या पुनर्वसन जमिनीची मोजणी करण्यासाठी भू-कर माफक शहाजी पाटील व हरिश्चंद्र निलवे यांची नेमणूक केली आहे.
1 comment:

Subhash G. Hiremath, Civil Engineer, Pune,Dhayari-411041 said...

प्रकल्पदाते हा शब्दप्रयोग केला आहे, तो आवडला. 🙏🌹👌

Post a Comment