जीवन सुंदर बनविन्यासाठी ताण तणावापासून दूर रहा - मानसोपचार तज्ञ डॉ. चारूशिला भास्कर - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2021

जीवन सुंदर बनविन्यासाठी ताण तणावापासून दूर रहा - मानसोपचार तज्ञ डॉ. चारूशिला भास्कर

मानसोपचार तज्ञ डॉ . चारूशिला भास्कर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना.

अडकूर/ सी. एल. वृत्तसेवा

          प्रत्येकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत. या अडचणीना सामोरे जाताना सकारात्मक विचारांची गरज आहे. जीवन सुंदर बनवण्यासाठी विद्यार्थ्यानी ताणतणावापासून दूर राहण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा मानसिक रुग्णालयातील डॉ .चारूशिला भास्कर यानी केले.
     श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, सी. पी. आर. हॉस्पीटल कोल्हापूर सेवा रुग्णालयाच्या वतीने विद्यार्थी ताण -तणाव व कोरोना संदर्भात घ्यावयाची काळजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. चारूशिला भास्कर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. पाटील बोलत होते.
       डाॅ. चारुशिला पुढे बोलताना म्हणाल्या, ``गेले वर्षभर आपण सर्वजन कोरोनाशी सामना करत आहेत. कोरोणाची लस आता उपलब्ध असली तरीही अजून कोरोना संपला नाही. यामुळे विद्यार्थ्यानी कोरोणासंदर्भातील सर्व नियमांचे पालन शाळेमध्ये करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक महिन्यानंतर शाळा चालू होत असल्याने विद्यार्थी तणावात  आहेत. विशेषतः  १० वीच्या विद्यार्थ्यानी परिक्षेला सामोरे जाताणा तणाव न घेता निर्भयपणे सामोरे जायला हवे. रोज प्रणायम, फिरणे, सायकलिंग याबरोबरच पालेभाज्या, फळे असा चांगला आहार घेण्याचा सल्हाही डॉ. चारूशिला यानी दिला. यावेळी डॉ. पूजा साळोखे यानीही मनोगत व्यक्त केले.
         या कार्यक्रमाला व्ही. एन. सुर्यवंशी, एस. के. हरेर, एस. डी. पाटील, एस. के. पाटील, सी. डी. जोशी व विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य पाटील यानी केले. प्रास्ताविक पी. के. पाटील यांनी  केले.  आभार आर. व्ही. देसाई यांनी मानले.


No comments:

Post a Comment