चंदगड तहसिल कार्यालयातील बैठकीत संजय गांधी निराधार योजनेतील १०६ प्रकरणांना मंजूरी - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2021

चंदगड तहसिल कार्यालयातील बैठकीत संजय गांधी निराधार योजनेतील १०६ प्रकरणांना मंजूरी

चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना बैठकीत सहभागी अधिकारी व पदाधिकारी

चंदगड : सी एल वृत्तसेवा

          चंदगड तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीची मासिक बैठक तहसील कार्यालय चंदगड येथे नुकतीच कमिटीचे अध्यक्ष प्रवीण वाटंगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत तालुक्यातील निराधार व गरजू अशा १०६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आली. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सोमनाथ गवस यांचेसह महादेव मंडलिक, कृष्ण कांबळे, रणधीर सुतार, संज्योती मळवीकर, सौ. पी. एस. गवारी, सौ. एस. ए. कट्टी, सौ. सुतार आदींची उपस्थिती होती. 
          यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विचार मांडले. यापुढील काळात तालुक्यातील गरजू आणि योग्य लाभार्थी हेरून अधिकाधिक लोकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कमिटीला प्रशासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही नायब तहसीलदार संजय राजगोळे यांनी दिली. सोमनाथ गवस यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment