शिनोळी येथे शिवसेना उपजिल्हा प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते वाटर फिल्टर योजनेचा शूभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2021

शिनोळी येथे शिवसेना उपजिल्हा प्रभाकर खांडेकर यांच्या हस्ते वाटर फिल्टर योजनेचा शूभारंभ

 शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथे फेअर फिल्ड अॅ टलास  कंपनीच्या विकास योजनेंतर्गत वाटर मंजूर फिल्टर योजनेचा भूमिपूजन शूभारंभ करताना सरपंच नम्रता पाटील, रेणुका मनोळकर, गुणवंता ओऊलकर, जयश्री तरवाळ आदी.

चंदगड / प्रतिनिधी
    शिनोळी (ता. चंदगड) येथे फेअर फिल्ड अॅटलास  (दाना) कंपनीच्या स्थानिक विकास योजनेंतर्गत  (सी एस आर)फंडातून दिलेल्या 30 लाख रुपये वाटर फिल्टर योजनेचा भूमिपूजन शूभारंभ शिवसेना उपजिल्हा प्रभाकर खांडेकर, कंपनीच्या एच आर मॅनेजर  सरोजा होनगेकर  व सरपंच नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
          यावेळी  बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रभाकर खांडेकर म्हणाले,  ``फेअर फिल्ड अॅ टलास   (दाना) कंपनीच्या सहकार्याने  तीस लाख रुपयांची योजना मंजूर करून घेऊन ग्रामस्थांना तीन महिन्यांच्या आत स्वच्छ पाणी देण्यासाठी  केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. कंपनीने  प्राथमिक शाळेतील मुलांना संगणकाचे सहा संच दिले आहेत.विकास कामांत कोणी अडचण निर्माण करू नये असे आवाहन केले.``
           यावेळी रेणुका मनोळकर, गुणवंता ओऊलकर, जयश्री तरवाळ, तानाजी खांडेकर, मारूती पाटील, सौ.वंदना पाटील, बाळासाहेब पाटील, परशराम मनोळकर, नारायण तातोबा पाटील, कृष्णा पाटील, गजानन पाटील, शांताराम बोकमुरकर, दादा ओऊलकर, नाना पाटील ,परसू ल.मनोळकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment