अडकूर येथे भात खरेदीस शेतकऱ्यांकडून प्रतिसाद, भात खरेदीला प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2021

अडकूर येथे भात खरेदीस शेतकऱ्यांकडून प्रतिसाद, भात खरेदीला प्रारंभ

 

अडकूर (ता. चंदगड) येथे ओमसाई काजू कारखान्याव शासन मान्य भात खरेदी केंद्राचा शूभारंभ करताना उदयकूमार देशपांडे, संभाजीराव देसाई, विद्याधर गूरबे,रेगडे,देसाई आदी

चंदगड / प्रतिनिधी
         चंदगड तालुक्यातील  शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी चंदगड तालुका कृषि माल फलोतपादन सहकारी संघ दाटे या संघाने अडकूर येथे शासनने भात खरेदी केंद्र सुरू करून फार मोठा दिलासा दिला आहे. याचा फायदा तालूक्यातील  शेतकर्यानी घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव रेंगडे यांनी केले. अडकूर (ता. चंदगड) भात खरेदी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी काढले. अधयक्षसथानी तालुका काॅगेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई होते. 
          प्रास्ताविक संघाचे चेअरमन उदयकुमार देशपांडे यांनी करून अडकूर येथें भात खरेदी केंद्र सुरू केंद्र शासनाने जाहिर केलेलया आधार भूत भात खरेदी किंमत प्रति क्विंटल रू १८६८/आहे. महाराष्ट्र शासन प्रति क्विंटल रू.७००|अनुदान लवकरच जाहिर करणार असून एकुण दर २५६८\मिळनार आहे. त्याचा फायदा शेतकरी बांधुनी घ्यावा असे सांगितले.
             यावेळी सभापती  विद्याधर गुरबे यांनी अडकूर येथें भात खरेदी केंद्र सुरू केल्यामुळे चंदगड आजरा गडहिंगलज तालुक्यातील शेतकरयांची चांगली सोय होणार आहे. संभाजीराव देसाई यांनी भाताबरोबर नाचणी व काजू हमीभाव दारामध्ये खरेदी  करण्याची मागणी केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी अनिल देसाई यांनी शेतकऱ्यांच्या भाताचे पैसे वेळेत बॅंक खात्यावर जमा होणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त भात खरेदी करणार असलयाचे सांगितले. यावेळी माजी सभापती बबन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. धनाजी देसाई यांनी आभार मानले. यावेळी मानसिंग देसाई, पांडूरंग जाधव, महादेव गावडे, राजू देशपांडे, रामू गावडे आदी शेतकरी उपस्थित होते. शुभारंभ प्रसंगी चार शेतकर्याचे ५० क्विंटल खरेदी झाले.

No comments:

Post a Comment