पाणंद रस्ते खूले झाल्याने शेतकऱ्यांची सोय - जिल्हाधिकारी देसाई, सत्तेवाडी येथे पाणंद रस्त्याचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

पाणंद रस्ते खूले झाल्याने शेतकऱ्यांची सोय - जिल्हाधिकारी देसाई, सत्तेवाडी येथे पाणंद रस्त्याचा शुभारंभ

पाणंद रस्त्याचा शुभारंभ करताना जिल्हाधिकारी दौलत देसाई, माजी राज्यमंत्री भरमु पाटील, सभापती अॅड. अनंत कांबळे व इतर

चंदगड / प्रतिनिधी

           जिल्ह्यातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला हेरे सरंजामचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे  तालुक्यातील ५५ गावातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनी मिळण्यास मदत झाली. त्याच धर्तीवर आजचा हा पाणंदी खुल्या करण्याचा हा अभिनव उपक्रम असून त्यातून शेतकऱ्यांना मोठी सोय होणार आहे. अशाच पद्धतीने लोकांनी आपल्या समस्या घेवून आल्यावर सरसकट लोकांच्या हिताचे प्रश्न अग्रक्रमाणे सोडवण्याचा आपला प्रयत्न राहिल मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले. सत्तेवाडी (ता. चंदगड) येथे राजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्ते खूले करण्याप्रसंगी बोलत होते. स्वागत तहसिलदार विनोद रणवरे यांनी केले.

       जिल्हाधिकारी देसाई पूढे म्हणाले, ``महसूल खात्याला काम पुरवून पुरवून करायची सवय आहे. मात्र, आता काम एकदाच करुन संपवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महसुल लोकजत्रा या अभिनव मोहिमेतून जवळपास तीस विविध विषय मार्गी लागतील असे सांगितले.`` 

       यावेळी प्रातांधिकारी विजया पांगारकर म्हणाल्या, लोकांनी आमच्याकडे प्रश्न घेवून यावेत जितके शक्य होतील ते कायद्याच्या चौकटीत सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. तसेच महसूल लोकजत्रा या अभिनव मोहिमेचे उगम या चंदगड तालुक्यात झाला आहे. जे रस्ते 2 ते 3 कोलोमिटर किंवा दोन गावांना जोडणारे रस्ते आहेत ते आपण आज खुले करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे.

       यावेळी गडहिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे, माजी मंत्री भरमू पाटील, गोपाळ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, सभापती अँड. अनंत कांबळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे, माजी सरपंच डी. जी. नाईक यासह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हापरिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या जि. प. निधीतून सत्तेवाडी गावातील नळपाणी योजनेचे उद्घाटन दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.



No comments:

Post a Comment