मलतवाडी येथे शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

मलतवाडी येथे शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी

     मलतवाडी (ता. चंदगड) येथील स्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त शुक्रवार दि. १ ९ फेब्रुवारी २०२१ रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

       मायाप्पा मंदिरात दि. १ ९ रोजी सायंकाळी सहा वाजता ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. 'जाणता राजा शिवछत्रपती' , 'स्वराज्य रक्षक संभाजी महाराज' असे या वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत. ही स्पर्धा जिल्हास्तरीय (खुला गट) आणि गाव मर्यादित अशा दोन गटात होणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २००१, १५०१ व १००१ रुपये आणि चषक, तसेच गाव मर्यादित गटातील प्रथम विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५०१, ४०१, ३०१ व उत्तेजनार्थ १०१ रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी दिली.
No comments:

Post a Comment