कर्नाटकातील मोठी दड्डी-मोहनगेची भावेश्वरी यात्रा होणार की नाही? काय आहे प्रशासनाचा निर्णय? वाचा सविस्तर....... - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

कर्नाटकातील मोठी दड्डी-मोहनगेची भावेश्वरी यात्रा होणार की नाही? काय आहे प्रशासनाचा निर्णय? वाचा सविस्तर.......

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर यंदा कर्नाटक मधील दड्डी-मोहनगे (ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी देवीची माघी यात्रा भरणार की नाही याबद्दल भाविकांमध्ये संभ्रमावस्था होती. ती दूर झाली असून कर्नाटक प्रशासनाने यात्रेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे लाखो भाविक व व्यापारी वर्गाच्या उत्साहाला उधाण आले आहे.

      दक्षिण महाराष्ट्र उत्तर कर्नाटक परिसरातील सर्वात मोठी माही यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी कोरोना महामारी च्या कारणास्तव अनेक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे मोहनगे यात्रा रद्द करावी की कसे याबाबत यात्रा कमिटी चा निर्णय होत नव्हता. तथापि कोरोना कमी झाला असल्यामुळे विविध स्तरातून यात्रा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला काल यश आले असून यात्रा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी या विभागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अमोल दळवी, दयानंद पाटील, अण्णा कोकितकर आदींनी बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्हाधिकारी व  प्रशासनाच्या शंकांचे निरसन केले व यात्रेसाठी त्यांची सहमती मिळवली. आता हुक्केरी तालुक्याचे तहसीलदार यांच्या आदेशानंतर २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या यात्रा उत्सवाच्या तयारीला वेग येणार आहे. या निर्णयाचे लाखो भाविक व व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment