राजगोळी येथील क्वालिटी ॲनिमल फिडस् मध्ये कामगार संघटनेची स्थापना - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

राजगोळी येथील क्वालिटी ॲनिमल फिडस् मध्ये कामगार संघटनेची स्थापना

राजगोळी (ता. चंदगड) येथील क्वालिटी फ ॲनिमल फिडस् कंपनीत शिवगर्जाना कामगार संघटनेच्या फलक अनावरण प्रसंगी संतोष बेंद्रे ,संदीप कांबळे, गावडे,परिट आदी 

चंदगड / प्रतिनिधी

       राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील क्वालिटी ॲनिमल  फिड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मधे पुणे येथील शिवगर्जना कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या फलकाचे अनावरण शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बेद्रे यानी  कामगारांना संघटनेची ध्येय-धोरणे, दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात संदीप कांबळे यांनी  संघटनेची गरज सध्याच्या काळात का असते याची माहिती दिली.  यावेळी पांडुरंग गावडे, रवींद्र परीट, नवनाथ जाधव, मोहन गावडे, सुधीर कडुकर, विनायक निर्मळकर, सागर पाटील, संतोष जाधव सह सर्व  कामगार उपस्थित होते. शिवगर्जना कामगार संघटनेची कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच शाखा आहे. यावेळी कामगारांनी जून्या संघटनेचे सामूहिक राजीनामे दिले.

No comments:

Post a Comment