सांबरे येथे गुरुवार १८ रोजी निमंत्रित महिला व पुरुष वजनी कब्बड्डी स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

सांबरे येथे गुरुवार १८ रोजी निमंत्रित महिला व पुरुष वजनी कब्बड्डी स्पर्धा

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा

        श्री कलमेश्वर क्रीडा मंडळ सांबरे ( ता. गडहिंग्लज ) यांचेकडून गुरुवार व शुक्रवार दि १८ व १९ रोजी निमंत्रित महिला व पुरुष वजनी कब्बड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

       आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर असणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य कलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धा  पुढीलप्रमाणे - निमंत्रित महिला गट -बक्षिसे- प्रथम क्रमांक -७०० हजार रुपये , द्वितिय- ५००० तृतिय-३००० ह .रूपये,चषक ६५ किलो वजनी गट- पुरूष प्रयम - १०००० , ७००० व ५००० हजार रूपये४८ किलो वजनी गट - . ५००० , ३००० , २००० हजार रूपये व चषक ३५ किलो वजनी गट -३००० , २००० ,१०००  हजार रूपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत . तरी इच्छूक खेळाडूनी या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment