तिलारी मत्सबीज केंद्र सूरू करा - आमदार राजेश पाटील यांची मत्सपालन मंत्र्याशी चर्चा - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

तिलारी मत्सबीज केंद्र सूरू करा - आमदार राजेश पाटील यांची मत्सपालन मंत्र्याशी चर्चा

मुंबई येथे चंदगड तालूक्यातील मत्स्य व्यवसायासंदर्भात मत्स्यमंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा करताना आमदार राजेश पाटील.

चंदगड / प्रतिनिधी

        तिलारीनगर (ता. चंदगड) येथे गेली 24 वर्षे अपूर्ण अवस्थेत असलेले  मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी मुंबई सहयाद्री अतिथीगृहात मत्स्यपालन मंत्री अस्लम शेख  यांच्या सोबत बैठक पार पडली. चंदगड चे आमदार राजेश पाटील यानी वेळी मंत्री शेख यांच्याशी सविस्तर चर्चा केली.   

       तिलारी मत्स्यबीज केंद्र चालू झाले तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हातील जलाशयाच्या मत्स्य ठेकेदारांना व मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मत्स्यबीज सहज उपलब्ध होईल. तसेच मत्स्यव्यवसाय मध्ये नवीन येणाऱ्या तरुणांना जिल्ह्यातच मत्स्यबीज उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल, व तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतील. सध्या स्थितीत बेळगाव, हुबळी, कोल्हापूर, सांगली हे  मत्स्य बाजार उपलब्ध आहेत,यामुळे यासाठी येणाऱ्या अडचणी दुर करून तिलारी मत्स्यबीज केंद्र तात्काळ चालू करावे अशी मागणी  आमदार राजेश पाटील यांनी केली.

         यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 65 पाठबांधरे व जलसंधारण खात्याच्या जलाशयाच्या माध्यमातून जवळपास 5000 ते 6000 हेक्टर जमीनत पाणी साठवले जाते. याच बरोबर जिल्हा परिषदेचे सुद्धा 150 तलाव आहेत. यावेळी मंत्री शेख यांनी  सकारात्मक प्रतिसाद दिला व तातडीने केंद्र चालू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.यावेळी मत्स  उपसचिव श्रीनिवास शास्त्री, आयुक्त आर. आर जाधव, कोल्हापूर सहाय्यक आयुक्त प्रवीण सुर्वे, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई राजेंद्र जाधव, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय पुणे विभाग अभय देशपांडे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी तिलारी मत्सबीज केंद्र सतीश खाडे, उपायुक्त मत्स्यव्यवसाय युवराज चौगुले  बैठकीला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment