अडकूर बाजारपेठेतील पोलिस व ग्रामपंचायतीने काढली अतिक्रमणे, पहा आणि वाचा फक्त चंदगड लाईव्हवर....... - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

अडकूर बाजारपेठेतील पोलिस व ग्रामपंचायतीने काढली अतिक्रमणे, पहा आणि वाचा फक्त चंदगड लाईव्हवर.......

 

अडकूर बाजारपेठेत रस्त्यावर अतिक्रमण कसणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करताना हवालदार आर. डी. नांगरे, कॉ. विजय सोनुले

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

   दर बुधवारी आठवडा बाजार दिवशी अडकूर (ता. चंदगड) बाजारपेठेतील चंदगड-नेसरी रस्त्यावर होणारे व्यापाऱ्यांचे अतिक्रमण पोलिस व ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आले.

        येथे दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार आतील बाजारपेठेमध्ये कमी पण चंदगड नेसरी रस्त्याच्या दोन्ही बाजुना अधिक भरत होता यामध्येच चार चाकी व दूचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात पार्किंग होत होती . याचा त्रास चंदगड - नेसरी या मुख्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकाना होत होता. यासंदर्भात अडकूर ग्रामपंचायतीने चंदगड पोलिस ठाण्याशी पत्रव्यवहार केला होता. याची दखल घेऊन आज चंदगड पोलिस ठाण्यातील वाहतूक विभागातील हवालदार  आर. डी. नांगरे व कॉं. विजय सोनुले यानी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने या मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमण मागे हटवले. तसेच या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा चुना टाकून जागा निश्चित केली. या कारवाईने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असून अशी कारवाई नेहमीच करण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येत आहे. यावेळी उपसरपंच अनिल कांबळे, राजाराम घोरपडे, ग्रामसेवक श्रीकांत सोनार, पो. पाटील के. आर. गुरव, शिरीन शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment