गडहिंग्लज येथे फुड प्रोसेसिंग कार्यशाळेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

गडहिंग्लज येथे फुड प्रोसेसिंग कार्यशाळेचे आयोजनकोल्हापूर (जिल्हा माहिती अधिकारी)

        महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तसेच शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने *गडहिंग्लज येथे 'फूड प्रोसेसिंग आणि मसाले निर्मिती'* या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कोल्हापूरी मसाला क्लस्टरचे चेअरमन दिपक मांगले यांनी दिली. *22 फेब्रुवारी ते 3 मार्च* या कालावधीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 

       कोल्हापूर जिल्हा खाद्यसंस्कृतीने संपन्न आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात 'कोल्हापूरी' या नावाने डिश प्रसिद्ध आहे. अन्नधान्य उत्पादनात आपला जिल्हा अग्रक्रमांकावर तर आहे मात्र कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये त्याची म्हणावी तितकी भरभराट झालेली नाही. हीच तांत्रिक उत्पादन क्षमता वाढावी या हेतूने ग्रामीण भागातील पहिल्या फुड प्रोसेसिंग आणि मसाले निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

             कार्यशाळेत अन्न प्रकिया उद्योगातील संधी, उद्योजकीय मानसिकता, व्यक्तिमत्व विकास, अन्नपदार्थ जतन (प्रिझर्वेशन) शास्त्रशुद्ध प्रकिया, प्रयोगशाळा चाचणीचे महत्व आणि माहिती, मिरची, हळद पूड, कांदा, आले, लसून प्रकिया, शास्त्रोक्त पद्धतीने सर्व प्रकारचे मसाले लोणची निर्मिती, मार्केटिंगचे नव नवे प्रकार तसेच मार्केट सर्वे, ब्रँडींग, शासकीय योजना आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक शासकीय परवाने यांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

           त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या फुड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. ए.के. साहू, डॉ. अभिजीत गाताडे , डॉ. तेजस्विनी व्हसकोटी, डॉ. एस्.एम्. लोखंडे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. शबाना मेमन, रेणूका तुरंबेकर, डॉ. संजय पाटील या तज्ञांचे मागर्दर्शन मिळणार आहे.

        कार्यशाळेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी कोल्हापूरी मसाला क्लस्टरचे चेअरमन दिपक मांगले (9850678257), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी रामचंद्र गावडे (9021343734) किंवा प्रकल्प अधिकारी प्रविण कायंदे (9403078774) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सूचना* : कार्यशाळेसाठी रु. 4720 शासकीय प्रवेश शुल्क असून सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी प्रवेशशुल्क आणि आधारकार्ड *खाद्यभ्रमंती, नगरपालिकेसमोर, गडहिंग्लज* येथे कार्यालयीन वेळेत जमा करावे. पहिल्या 40 उद्योजकांना प्रवेश निश्चित केला जाईल.
No comments:

Post a Comment