अडकुर येथे मंदिर व विकासासाठीसाठी २५ लाखाचा निधी घोषित - मंत्री मुश्रीफ - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

अडकुर येथे मंदिर व विकासासाठीसाठी २५ लाखाचा निधी घोषित - मंत्री मुश्रीफ

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान 

अडकूर (ता. चंदगड) येथे सुरेखा फॅमिली रेस्टॉरंट चे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मूश्रीफ, बाजूला आमदार राजेश पाटील, आपटेकर बंधू.  चंदगड / प्रतिनिधी

          राज्य शासनाकडून २ लाख रुपयाच्या वरील आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान लवकरच देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. अडकुर येथे सुरेखा फॅमिली रेस्टोरंटच्या उद्घाटनासाठी आले असता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही ग्वाही दिली. 

          मुश्रीफ पुढे  म्हणाले, कोरोनानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून या वर्षभरात विकासकामांना प्राधान्य देऊ. चंदगड मतदारसंघातील पाटणे फाटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाली असून त्याला एमआयडीसीची ४ एकर जागा देखील उपलब्ध झाली आहे .चंदगड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

          यावेळी अडकुर गावाच्या रवळनाथ मंदिरासाठी अभय देसाई यांनी क वर्ग दर्जा मिळावा व विकासासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. त्याला त्वरित मान्यता देत मुश्रीफ यांनी 25 लाखाचा निधी देण्याची घोषणा केली.यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले की, जसा कागलचा विकास होत आहे तसाच चंदगडच्या विकासाकडे मुश्रीफ यांनी लक्ष घालावे. या मतदारसंघातील तरुणांमध्ये कौशल्ये आहेत, मात्र त्यांना रोजगाराच्या संधीसाठी बाहेर जावे लागते. तरी या परिसरात तीन एमआयडीसी आहेत, त्यामुळे याठिकाणी रोजगार निर्मिती व्हावी, मोठे उद्योगधंदे यावेत यासाठी मुश्रीफ आणि आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अभय देसाई  आभार मानले.

No comments:

Post a Comment