नागनवाडी येथील धनंजय व संजय गांधी विद्यालयाचे १५०० विद्यार्थी करणार रास्ता रोको? वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

नागनवाडी येथील धनंजय व संजय गांधी विद्यालयाचे १५०० विद्यार्थी करणार रास्ता रोको? वाचा काय आहे कारण?

रास्ता रोकोचे निवेदन पोलिसांना देताना विद्यालयाचे शिक्षक व इतर. 

चंदगड / प्रतिनिधी
          सायंकळी शाळा सूटताना पाच वाजता केरवडे व पोवाचीवाडी या गावांना जाणाऱ्या बस फेऱ्या सूरू कराव्यात. या मागणीसाठी नागनवाडी (ता. चंदगड) येथे गूरूवार ११ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी वाजता बेळगाव - वेगूर्ला महामार्गावर धनंजय विद्यालय व संंजय गांधी विद्यालयाचे १५०० विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. 
             केरवडे व पोवाचीवाडी या गावांना जाणार्या बस फेऱ्या मार्च २०२० पासून जवळपास वर्षभर  बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. या गाड्या सुरू कराव्यात यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायती व विद्यालयामार्फत निवेदने दिली आहेत. मात्र चंदगड आगाराने या निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यी आंदोलन करणार आहेत. निवेदनच्या प्रती तहसिलदार, चंदगड आगार व पोलिसांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर ॲड. संतोष मळवीकर, मुख्याध्यापक महादेव भोगूलकर, तानाजी पाटील, अनिल गावडे, प्रकाश चव्हाण, दिलीप ढोणूक्षे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.



No comments:

Post a Comment