महादेव शिवनगेकर योगेश शिवणगेकर
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुका संतसेना महाराज नाभिक समाज संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी महादेव शिवणगेकर तर उपाध्यक्षपदी योगेश शिवणगेकर यांची निवड झाली. माणगाव (ता. चंदगड) येथील बैठकीस जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, राष्ट्रीय ऊपाध्यक्ष एम. आर. टिपूगडे, पश्चिम महाराष्र्ट विभागीय अध्यक्ष मारुती टिपूगडे, कार्याध्यक्ष बाबासाहेब काशिद, अनिल संकपाळ अध्यक्ष कागल, मार्गदर्शक सपताळे, पंस. चंदगड उपसभापती मनीषा शिवणगेकर यांच्या उपस्थितीत निवडीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नागरिक गोविंद शिवणगेकर होते. प्रास्ताविक गुंडू शिवणगेकर यांनी केले.
उर्वरित कार्यकारिणीत जिल्हा ऊपाध्यक्ष कृष्णा बामणे, विष्णू बामणे, शंकर शिवणगेकर, महादेव शिवणगेकर, सुनिल शिवणगेकर, दिनकर शिवणगेकर, आदी २५ जणांचा समावेश आहे. बैठकीस मावळते अध्यक्ष हणमंत जाधव, वैजनाथ शिवणगेकर, अशोक शिवणगेकर, संजय शिरगावकर, यल्लाप्पा गडकरी, शंकर सरशेट्टी, धुळाप्पा सरशेट्टी, संजय शिंदे, जिल्हा महिला प्रतिनिधी शोभा नावलगी, गीता बामणे उपस्थित होते. यावेळी समाजातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शिवणेकर यांनी तर आभार शंकर कोरी यांनी मानले.
No comments:
Post a Comment