चंदगड येथील तहसील कार्यालय परिसरातील रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

चंदगड येथील तहसील कार्यालय परिसरातील रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

चंदगड येथील तहसील कार्यालय परिसरातील रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करताना भरमूआण्णा पाटील व इतर.

चंदगड / प्रतिनिधी

     चंदगड येथील प्रभाग दोनमधील तहसीलदार कार्यालयल ते ग्रामीण रुग्णालय रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जि प सदस्य सचिन बल्लाळ यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रस्त्या डांबरीकरणाचा शूभारंभ माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्राची काणेकर होत्या.

         प्रास्ताविक संजय चंदगडकर यांनी केले. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सर्व नगरसेवक एकत्र येऊन विकास कामाचा शुभारंभ करत असल्याचे पाहून मी आनंदी झालो आहे. यापुढील काळात सर्वांनी गटतट न मानता चंदगडच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करावे. माझे सर्वोतोपरी सहकार्य राहिल, असे सांगितले. प्रभाग दोनमधील चंदगड नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप चंदगडकर यांनी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांचा सर्व वार्ड क्रमांक दोनमधील नागरिकांच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सभापती ॲड. अनंत कांबळे, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, शांताराम पाटील, उद्योजक सुनील काणेकर, मुरलीधर बल्लाळ, समृध्दी काणेकर, शिक्षण सभापती अनीता परीट, दिलावर सय्यद, मुख्याधिकारीअभिजित जगताप, सुरेश सातवणेकर, खाजा नाईक, अब्दुल नेसरीकर, विजय गुरव, शिवदास पाटील, बशीर नाईकवाडी, सचिन नेसरीकर, विजय कडूकर, अभिजित गुरबे, बाळासाहेब हळदणकर, मेहताब नाईकवाडी, प्रमीला गावडे, रोहित वाटंगी, नेत्रप्रभा कांबळे, अश्विनी दाणी, शिवानंद हुंबरवाडी, संजना कोकरेकर, संजिवनी चंदगडकर, ममताज मदार, झाकीर नाईक,यशवंत देळेकर, आकाश चंदगडकर, ओंकार चंदगडकर, अशोक पोतनीस, तेजस गावडे, संकेत बुरूड, स्वप्नील कांबळे, अमोल पोतनिस, स्वप्नील अनगुडे, प्रकाश पाटील, पवन राजहंस, दिनेश शेरेगार उपस्थित होते. आभार जय बुरूड यांनी मानले.No comments:

Post a Comment