अडकूर येथे कै. नरसिंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ व्यायामशाळेची आमदार राजेश पाटील यांच्याकडे मंडळाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

अडकूर येथे कै. नरसिंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ व्यायामशाळेची आमदार राजेश पाटील यांच्याकडे मंडळाची मागणी

अडकूर येथे व्यायाम शाळा व्हावी या मागणीचे निवेदन देताना युनिटी फौंडेशनचे कार्यकर्ते. 

चंदगड / प्रतिनिधी

      अडकूर (ता. चंदगड) येथे स्वर्गीय आमदार नरसिंगरावजी पाटील यांच्या नावाने नाना - नानी पार्क व अत्याधुनिक व्यायाम शाळा स्थापन करावी अशी मागणी युनिटी फौंडेशनच्या वतीने आम राजेश पाटील यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.  

     आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम महत्वाचा आहे. त्यासाठी ओपन जिम तसेच वृद्धांसाठी नाना-नानी पार्क होणे गरजेचा आहे. तरी अडकूर हे पंचक्रोशी व तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी स्वर्गीय आमदार नरसिंगराव पाटील यांचे नावाने ही संकल्पना राबवावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. तरी याला  जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा व सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

            यावेळी यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे प्रशासक अभय देसाई, मनोहर देसाई, महेश आंबीटकर, महेश देसाई, दिलीप भेकणे, अजित अरदाळकर, युवराज शिंदे, सुरेश पवार, रमेश सुतार अहादेव रेंगडे, संतोष घोरपडे, संदीप इंगवले आदी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment