![]() |
नरगट्टे (ता. चंदगड) येथे गव्याचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. |
नरगट्टे (ता. चंदगड) येथील सुशेवा भिमसेन नाईक यांच्या शेतात (ग. नं. 495)
मध्ये नर जातीचा गवा मृत अवस्थेत आढळुन आला. पशुवैधकीय अधिकारी डॉ. महेश
भांदुर्गे यांनी मृतदेहाची उतरीय तपासणी करुन गवा नैसर्गिक मृत झालेचे
सांगितले. त्यानंतर गव्याचे दहन दफन करणेत आले. पाटणेचे वनक्षेत्रपाल
दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जि. एम. होगाडे,
वनरक्षक एस. एस. जीतकर, डि. ए. कदम, वनमजुर लहु पाटील व ग्रामस्थांनी याकामी सहकार्य
केले.
No comments:
Post a Comment