![]() |
कंग्राळी (ता. जि. बेळगाव) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकल्या नंतर हात उंचावून प्रेक्षकांना अभिवादन करताना पै सागर मोहळकर |
चंदगड / प्रतिनिधी
कंग्राळी (ता. जि. बेळगाव) येथील बाल हनुमान तालीम मंडळामार्फत आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात शाहू आखाड्याचा पै सागर मोहोळकर याने कर्नाटक केसरी पै. संगमेश बिराजदार याला हप्ते डावावर चितपट केले.
छत्रपती शाहू महाराज बाजार समिती कोल्हापूर
येथील शाहू आखाडा तालमीचा पैलवान सागर मोहोळकर विरूद्ध बेळगावच्या संगमेश
बिराजदार यांच्यात १०६ किलो वजनी गटात क्रमांक १ची कुस्ती झाली. या निकाली
कुस्तीत पैलवान सागर मोहोळकर याने हप्ते डावावर संगमेश यांच्यावर विजय
मिळवला. सागर मोहोळकर हा वस्ताद सादिक पटेल यांचा पट्टा असून वस्ताद प्रकाश
गावडे पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्यातून हे यश मिळवले.पै सागर याची
महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०२१ साठी गादी विभागामधून खुला
गटात निवड झाली आहे. तसेच या मैदानात पै यश पाटील, पै भैया माने, पै. गौरव पाटील यांनीही चटकदार कुस्त्या केल्या.
No comments:
Post a Comment