मजरे कार्वे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग बेनके बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2021

मजरे कार्वे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग बेनके बिनविरोध

पांडुरंग बेनके

चंदगड / प्रतिनिधी

       मजरे कारवे  (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पांडुरंग कृष्णा बेनके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी तुपारे होते. 

      उपसरपंच निवृत्ती हारकारे यांनी  उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या  जागेसाठी बेनके यांचे नाव निश्चित करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य अरुण सुतार,  तलाठी राजश्री पचंडी, ग्रामसेवक दुंडगेकर,  तानाजी गडकरी, देवाप्पा बोकडे, एम. एम. तुपारे, मारुती कदम, अरुण तुपारे, नामदेव बिरजे, अशोक हारकारे, नारायण पवार,  सरपंच शिवाजी तुपारे यांच्यासह दिलीप परीट, बेबीताई बोकडे, स्मिता बेनके, अंजली सुतार, प्रियांका हारकारे उपस्थित होते. आभार एस. आर. पाटील यांनी मानले. 

No comments:

Post a Comment