ओलम (हेमरस)साखर कारखान्याचे आज अखेर 5.83 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2021

ओलम (हेमरस)साखर कारखान्याचे आज अखेर 5.83 लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण

 

भरत कुंडल

कोवाड / प्रतिनिधी

        राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाची सांगता १२ मार्च  ऐवजी १५ मार्च रोजी करण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला असून तोडणी न झालेल्या ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधून आपला ऊस पाठविण्याचे आवाहन कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले आहे.

ओलम (हेमरस)साखर कारखाना

      हेमरस कारखान्याला  चालू गळीत हंगामामध्ये (२०२०-२१) आजवर एकूण १८ हजार २०० ऊस उत्पादकानी  ५ लाख ८३ हजार मेट्रिक टन ऊस गाळपा साठी पाठवून सहकार्य केले आहे.  शेतकरी, तोडणी व वाहतूकदार यांच्या सहकार्याने गड हिंग्लज विभागातून उच्चांकी ऊसाचे गाळप केले असल्याचे यावेळी मुख्य शेती अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. पुढील चार ते पाच दिवसात शिल्लक राहिलेल्या ऊसाची उचल करणार असून त्यादृष्टीने तोडणी यंत्रणा गतिमान केली आहे.

          तसेच १५ फेब्रुवारी पर्यंत आलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून २८ फेब्रुवारी पर्यंत ची तोडणी वाहतूकदारांची बिले ही येत्या तीन ते चार दिवसात जमा केली जातील.

       सुरुवातीला कारखान्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊन देखील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी व वाहतूकदार यांच्या बरोबरच कारखान्याचे कामगार यांच्या सहकार्याने चालू गळीत हंगामाची यशस्वी सांगता होत असून या सर्वांचे कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी आभार मानले.

१२ मार्च ला चालू गळीत हंगामाची सांगता होण्याचे ठरले असता शिल्लक राहिलेला ऊस संपविण्यासाठी १५ मार्च पर्यंत कमी गाळप क्षमतेने चालू ठेवणार कारखाना - भरत कुंडल



No comments:

Post a Comment