कालकुंद्री येथे `तलप ' कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2021

कालकुंद्री येथे `तलप ' कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

 

कालकुंद्री येथे `तलप ' कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी. 

चंदगड / प्रतिनिधी

        कालकुंद्री (ता. चंदगड) ग्रामीण लेखक  के. जे. पाटील यांच्या 'तलप' कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. 

श्री. पाटील यांचे लचका, तलप व आघात हे तीन कथासंग्रह कोल्हापूरच्या  अभिनंदन प्रकाशनने प्रकाशित केले आहेत. त्यांच्या तलप कथा संग्रहाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन २०१६ मध्ये झाले होते. या कथासंग्रहाला विविध संस्थांचे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'तलप' हा कथासंग्रह वाचक व श्रोत्यांच्या पसंतीस उतरला आहे. यावेळी नंदकुमार ढेरे (लोकमत), नारायण गडकरी, श्रीकांत पाटील (पुढारी), निवृत्ती हारकारे (तरूण भारत), उदयकूमार देशपांडे, अनिल धूपदाळे, संपत पाटील, राहूल पाटील, संजय पाटील, चेतन शेरेगार, विलास कागणकर, तातोबा पाटील, लक्ष्मण आढाव, संतोष सुतार, नंदकीशोर गावडे, बाबा मुल्ला, शहानूर मुल्ला, चंदगड तालुक्यातील पत्रकारांनी के. जे. पाटील यांच्याशी संवाद साधून कथा, कथाबीज, संवाद, प्रसंग, कथापात्रे आदी विषयावर चर्चा केली.No comments:

Post a Comment