कालकुंद्री येथे शुक्रवारपासून सुरु होणारा 'अखंड नाम सप्ताह' रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2021

कालकुंद्री येथे शुक्रवारपासून सुरु होणारा 'अखंड नाम सप्ताह' रद्द

कालकुंद्री येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर चा अखंड नाम सप्ताह उत्सव यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. शुक्रवार १९ मार्च ते २६ मार्च अखेर आठ दिवस चालणाऱ्या  ९२ व्या अखंड नाम सप्ताह काळात शासकीय नियम पाळून केवळ धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत.

        गावोगावी हरिनाम सप्ताह साजरे केले जातात तथापि या सप्ताहात आठ रात्रंदिवस 'सांब सदाशिव सांब' चा गजर होतो. त्यामुळे महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात एक वैशिष्ट पूर्ण सप्ताह म्हणून श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताहाची ख्याती आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सप्ताह कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. सप्ताह काळात दरवर्षी होणारे कीर्तन, प्रवचन, दिंड्या, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आदी रद्द करण्यात आले असून खेळणी किंवा अन्य सर्व प्रकारच्या दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. २६ रोजी होणारा महाप्रसाद ही रद्द करण्यात आला असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सप्ताह  कमिटीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment