गणूचीवाडी प्राथमिक शाळेच्या ऊज्वला नाईक यांना बेस्ट टिचर पुरस्कार जाहीर...... - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2021

गणूचीवाडी प्राथमिक शाळेच्या ऊज्वला नाईक यांना बेस्ट टिचर पुरस्कार जाहीर......

ऊज्वला नाईक


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         विद्या मंदिर गणूचीवाडी (ता. चंदगड) येथील शिक्षिका श्रीमती उज्वला शिवाजी नाईक यांना LFW BEST TEACHER 2021 हा पुरस्कार जाहिर झाला.

          श्रीमती उज्वला नाईक यानी English learning programme मधील WPC हा उपक्रम कोविड कालखंडातही खंड पडू न देता ऑनलाईन, ऑफलाईन विद्यार्था वर्गाकडून राबवून घेतला. त्यानी इयत्ता  २ री व ४थी च्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी केली. त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांचा या उपक्रमात सहभाग करून घेतला. तसेच नोंदणी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजी रीडिंग व्हिडीओ त्याबरोबरच मुलानी सोडवलेल्या ऑनलाईन टेस्ट यावरून या मुलांना गुणदान करण्यात आले. त्याच्या आधारे आधारे या मुलानी शेवटपर्यंत मजल मारली. यासाठीच राज्यात निवडलेल्या 144 शिक्षकांमध्ये तसेच जिल्ह्यातील दहा शिक्षकांमध्ये श्रीमती नाईक यांची निवड झाली. चंदगड तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने अतिशय चांगला उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची प्रगती साधल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याचे सर्व श्रेय विद्यार्थी आणि या उपक्रमांमध्ये सहभागासाठी पालकांनी सहकार्य केल्याने या सर्वांना जाते असे मनोगत श्रीमती नाईक यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment