तालुक्यातील चंदगड तालुका पत्रकार संघाचे दोन पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह, संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी.... - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2021

तालुक्यातील चंदगड तालुका पत्रकार संघाचे दोन पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह, संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी....

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      संपुर्ण जगात धुमाकुळ माजवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चंदगड तालुक्यातील दोन पत्रकार पॉझिटीव्ह आले आहेत. शहराच्या तुलनेत सुरक्षित असलेल्या चंदगड तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केल्याने `आम्हाला काय होतय` म्हणून बिनधास्त फिरणाऱ्या गावागावीतील नागरीकांनाही यामुळे धोक्याची सुचना मिळली आहे. या दोन्हीही पत्रकारांना सर्व तपासण्या करुन त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. स्थानिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हे दोन्ही पत्रकार चंदगड लाईव्ह न्युजच्या टीमचे सदस्य आहेत. वार्तांकन करताना त्यांना कोरोनाची  लागण झाली आहे. चंदगड तालुका पत्रकार संघाचे दोघेही सदस्य आहेत. 

     कोरोनाच्या बाबतीत फाजील आत्मविश्वास न बाळगता कोरोनाच्या नियमांचे पालन अत्यंत काळजीपूर्वक करावे. नागरीकांनी आता फक्त महत्वाचे काय असेल तरच घराबाहेर पडा. मास्क, सॅनिटायझर सोबत सोशल डिस्टसिंग ठेवा. दुसऱ्या कोरोनाच्या विषाषुचा प्रभाव राज्यातसह ग्रामीण भागातही वाढल्याने आता स्वत:ची सुरक्षितता हिच त्यावरील उपाययोजना आहे. दररोज आढळून येणारे रुग्ण व उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सुविधा याचे प्रमाण बघितले तर मोठ्या प्रमाणात तफावत आढळत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी घरीच राहिल्यास काही प्रमाणात यावर आळा बसले. 

      चंदगड तालुक्यात आजच्या घडीला तरी इतर शहर तालुक्याच्या तुलनेत रुग्णसंख्या नियंत्रित आहे. शहरात नोकरीनिमित्त असलेले  चाकरमानी शहरातून घरी येण्यास सुरुवात झाल्यास ग्रामसमित्यांनी सतर्क राहून त्यांना अलगीकरण करावे. लोकांनी नियम न पाळल्यास परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. केवळ पोलिस व स्थानिक यंत्रणा दंड लावेल म्हणून मास्क व अन्य नियम न पाळता स्वत:साठी, स्वत:च्या इतरांच्या सुरक्षेसाठी कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. 


                          नागरीकांनी नियमांचे पालन करावे...

     कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरासह ग्रामीण भागातही फैलाव वाढत आहे. त्यामुळे शहरातून येणाऱ्या नागरीकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. स्थानिक ग्रामसमित्या गावागावात कार्यरत आहेत. त्यांना सहकार्य करुन गावचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाचे नियम पाळून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे. घाबरुन न जाता लक्षणे जाणवल्यास वेळीच उपचार घ्यावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. के. खोत यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment