मधमाशांच्या हल्ल्यात चौघे शेतकरी जखमी, चंदगड तालुक्यातील घटना...... - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2021

मधमाशांच्या हल्ल्यात चौघे शेतकरी जखमी, चंदगड तालुक्यातील घटना......

 

संग्रहित छायाचित्र

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

        निट्टूर (ता. चंदगड) येथे मधमाशांच्या हल्ल्यात चौघे जण जखमी झाले. ही घटना आज गुरुवार दि. २२ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. निट्टूर येथील शेतकरी नामदेव ईश्र्वर पाटील (वय ४२), मारुती मनोहर पाटील (वय ३५), शंकर हलगेकर (वय ६५), भरमु जानबा पाटील (वय ६०) वर्षे  हे शेतकरी ताम्रपर्णी नदी काठालगत आपल्या मळवी नावाच्या शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले होते. शेती कामात व्यस्त असताना दुपारी महादेव शामराव पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर असलेल्या 'कोणगे' मधमाशी पोळ्यातील माशांनी अचानकपणे हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र कोवाड येथे उपचार करण्यात आले. 

    याच परिसरात भात सुगीच्या हंगामात भाताची मळणी काढण्यासाठी गेलेल्या पाच- सहा महिलांना मधमाशांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. तशीच पुनरावृत्ती आज झाली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरात मधमाशांची दहशत निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment