कोरोना लसीच्या जनजागृतीसाठी सरसावले अडकूर केंद्रातील शिक्षक - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2021

कोरोना लसीच्या जनजागृतीसाठी सरसावले अडकूर केंद्रातील शिक्षक

 

नागरिकांनी लसीकरण करूण घ्यावे म्हणून गावोगावी जनजागृती करताना शिक्षक निवृती तिबिले व महादेव नाईक.

तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
    सध्या महाराष्ट्रात कोरोणाचा धुमाकूळ चालू आहे. कोरोणाच्या या साथीत हजारो जणांचा बळी जात आहे. अशा काळात आरोग्य विभाग , पोलिस , आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका बरोबरच प्राथमिक, माध्यमिक शिक्षकही कोरोणा योद्धा म्हणून कार्यरत आहेत . यामध्ये अडकूर केंद्रातील शिक्षकही कोरोणाचा फैलाव रोखण्याबरोबरच लसिकरणाच्या जनजागृतीसाठी पुढे सरसावले आहेत .  
        अडकूर केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक गट शिक्षणाधिकारी सौ . सुमन सुभेदार, विस्तार अधिकारी एम .टी. कांबळे व केंद्रप्रमुख जी .बी. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अध्यापना बरोबरच कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत . येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येणाऱ्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येते . मग तो कोरोना सर्वेक्षण असो अगर लसिकरण जनजागृती असो यामध्ये अडकूर केंद्रातील शिक्षक तात्काळ सहभागी होतात .केंद्रप्रमूख बी.जी. जगताप सोहब यांचे उत्तम नियोजन व शिक्षक व शासन यामधे खूपच चांगला समन्वय असत्याने या केंद्रातील सर्वच उपक्रमात शिक्षक हिरीरीने सहभाग घेतात . या केंद्रातील निवृत्ती तिबिले व महादेव नाईक या शिक्षकांनी तर ४५ वर्षावरील सर्वांचे लसीकरण १00 % पूर्ण व्हावे यासाठी गावोगावी हातात मिनी साऊंड सीस्टीम घेऊन जनजागृती चालू केली आहे . या केंद्रातील शिक्षक केवळ ज्ञानदानच नव्हे तर सामाजिक उपक्रमातही सहभागी होत असल्याने  सर्वत्र समाधान दिसून येत आहे.


No comments:

Post a Comment