ताम्रपर्णी नदीत दुषित पाणी सोडण्या-या उद्योगांवर कारवाई करा,शिवसेनेचे प्रदूषणला निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2021

ताम्रपर्णी नदीत दुषित पाणी सोडण्या-या उद्योगांवर कारवाई करा,शिवसेनेचे प्रदूषणला निवेदन

चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीच्या दूषित पाण्याचे नमुने घ्यावेत व दोषींवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रदूषणचे प्रदेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांना देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे.

चंदगड / प्रतिनिधी
       ताम्रपर्णी नदीपात्रातील दुषित पाण्यामुळे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे दुषित पाणी सोडण्या-या उद्योगांवर कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यानी कोल्हापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी रविंद आंधळे याना दिले आहे. 
        चंदगड तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारी ताम्रपर्णी  नदी अनेक गावातील पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याची तहान भागवते नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याचे पाणी वापरले जाते . एक महिन्यापूर्वी याच नदीत रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे प्रवाह दूषित झाला होता . त्यानंतर आता दुसऱ्यांदा असाच प्रकार घडला आहे . नदीत जागोजागी मासे मृत होऊन पाण्यावर तरंगत आहेत . ते कुजल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे . पाणीसुध्दा खराब झाले आहे . हे पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरल्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो शकतो. चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीच्या दूषित पाण्याचे नमुने घ्यावेत व कोणत्या उदयोगधंदयामुळे रासायनिक पाणी ताम्रपर्णी नदीत येत आहे, याचा त्वरीत शोध घ्यावा,ताम्रपर्णी नदी प्रदूषित करणाऱ्या उद्योगधंदयावर जलप्रदूषण कायद्या प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.



No comments:

Post a Comment