![]() |
ऊस तोडणी मजुरांनी घेतलेली रक्कम परत शेतकऱ्यांना अदा करताना नामदेव पाटील, विलास पाटील. |
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
दोन वर्षामागे बीडच्या ऊस तोडणी मजुरांनी कोवाड परिसरातील काही शेतकऱ्यांकडून काही रक्कम ही खाजगी कामासाठी घेतली होती. ती रक्कम हेमरस प्रशासनाने परत शेतकऱ्यांना परत मिळवून दिली आहे.
सविस्तर माहिती अशी कि, सन 2019-20 मध्ये बीडच्या ऊस कामगारांच्या टोळ्या कोवाड परिसरात ऊस तोडणी करत असताना काही मजुरांनी हुंदळेवादी येथील अमोल बामणे, किणी येथील रामचंद्र गणाचारी व रामदास बिर्जे आणि कोवाड येथील मारुती व्हन्याळकर या शेतकऱ्यांकडून काही रक्कम खाजगी कामासाठी वैयक्तिक घेतली होती.
यंदा सदर मजूर हे या भागात ऊस तोडणीसाठी दाखल झाले असताना विचारणा करून देखील ती रक्कम शेतकऱ्यांना परत मिळत न्हवती. त्यामुळे ही रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी हेमरस प्रशासनाकडे धाव घेतली. याची हेमरस व्यवस्थापनाने तात्काळ दखल घेत ऊस तोडणी मजुराच्या तोडणी बिलातून ती रक्कम वजा करून संबंधित शेतकऱ्यांना मिळवून दिली. सदर शेतकऱ्यांनी कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल, केन हेड सुधीर पाटील, कोवाड बिटचे नामदेव पाटील व कारखाना प्रशासन यांचे आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment