चंदगड तालुक्यात ४३ हजार १८२ नागरिकांना लस, ७५ टक्के काम - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2021

चंदगड तालुक्यात ४३ हजार १८२ नागरिकांना लस, ७५ टक्के काम



चंदगड / प्रतिनिधी (नंदकूमार ढेरे) 
         कोरोणाच्या पार्श्वभूमीवर १३ एप्रिल पर्यंत चंदगड तालुक्यात ४३ हजार १८२ नागरिकांचे लसीकरण आल्याची माहिती तालुकाआरोग्य अधिकारी डाॅ. आर. के. खोत यांनी दिली. 
        चंदगड तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र १० उप केंद्र अशा अकरा ठिकाणावरून लस देण्याचे सुरू आहे आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य केंद्रातुंन कोव्हिड  लसीकरण ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.तालुक्यात एकूण ७५ टक्के लसीकरणाचे काम झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या १८९४, ४५ ते ५९ वयोगटातील १७७४६, ६० वर्षावरील २२३९५ व हेल्थ वर्कर ११४७ अशा एकूण ४३१८२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तालुक्याची एकूण १,८६,०५३ लोकसंख्या असून लसीकरणासाठी ५७८३६ इतके उद्दिष्ट आहे. ग्रामीण रुग्णालय सह कोवाड माणगाव, हेरे, कानूर, अडकुर तूडये या प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागणवाडी, कारवे, शिनोळी, कालकुंद्री, पाटणे,जंगमहट्टी, कार्वे,आमरोळी, तूर्केवाडी,राजगोळी, तांबूळवाडी  या ठिकाणी लसीकरण सुरू आहे पहिल्या टप्प्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची  संख्या प्रमाणीत असलेल्या चंदगड तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण संख्याही अद्याप आवाआकात आहे. मात्र पूणे,  मुंबई येथील चाकरमानी गावी परतल्यास धोका वाढण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment