![]() |
शिनोळी येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा किट चे वाटप करताना कल्लाप्पा निवगिरे,सरपंच नितीन पाटील, बाबू चौगुले, उपसरपंच गुडेकर आदी |
चंदगड / प्रतिनिधी
शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका बांधकाम कामगार असोसिएशन च्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा किट,आत्यावशक सेवा संच,व स्मार्ट नोंदणी कार्ड वाटप करण्यात आले.
प्रारंभी स्वागत करून संघटनेचे अध्यक्ष कलाप्पा निवगीरे यानी बांधकाम कामगारांना संघटनेच्या माध्यमातून शासकीय लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती दिली.यावेळी सरपंच नितीन पाटील म्हणाले कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा आसेल तर आपली संघटना महत्वाची आहे संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळतो आणि ते तुमच्या संघटनेच्या माध्यमातून करून दाखवले आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष कलाप्पा निवगीरे यांचा सत्कार सरपंच नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला उपाध्यक्ष बाबू चौगले,सचिव मोहन चौगूले,खजिनदार उमाजी पवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला उपसरपंच रघुनाथ गुडेकर,अमृत जत्ती, विनोद पाटील, मोनेश्री चव्हाण, राजू किटवाडकर,शिवाजी पाटील,यासह बांधकाम कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment