चंदगड / प्रतिनिधी
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे मयत सभासदाच्या वारसाना संस्था सभासद कल्याण निधीतून आर्थिक सहाय्य करण्यात आले. गोविंद रुक्कमाण्णा आवडण (रा. हलकर्णी, ता. चंदगड) या सभासदाचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वारस पत्नी श्रीमती तुळसा गोविंद आवडण यांच्याकडे सभासद कल्याण निधीमधून संस्थेतर्फे १ लाख ५ हजाराची मदत देण्यात आली. चंदगड शाखा अध्यक्षा सौ . पुष्पा नेसरीकर यांच्या हस्ते मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आला . यावेळी रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, संचालक प्रा. डॉ. दत्ता पाटील, शाखा सल्लागार प्रा. डॉ. राजाराम साळुखे, रामचंद्र देशपांडे, संस्थेचे सीईओ डी. के. मायदेव, शाखाधिकारी दिपक शिंदे सह कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment