चंदगड तालुक्यात हतीसह अन्य वन जीवांचा वाढता वावर लक्षात घेऊन राज्य वन्यजीव मंडळाच्या संवर्धन राखीव वनक्षेत्राच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आता कोल्हापूर वनविभागाच्या कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गातील सात वनक्षेत्रांना संवर्धन राखीव वनक्षेत्रा'चा ( कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा मिळाला असून १५ मार्च२०२१ च्या राजपत्रात याची नोंद झाली आहे. चंदगड तालुक्यातील २३गावासह पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील ५७ गावे संरक्षित वनक्षेत्रात समाविष्ट केली आहेत. याची अधिसूचना राज्याचे वन उपसचिव गजेंद्र नरवणे यांनी नूकतीच काढली आहे.
चंदगड तालुक्यातील २३ गावे संरक्षित क्षेत्रात समाविष्ट असून तालुक्यातील २२५.४ चौरस किलोमीटर अधिवास क्षेत्र उपलब्ध झाले आहे. यामध्ये आडुरे, भोगोली, गुडवळे खालसा, ईसापूर, झांबरे, कोकरे, नागवे, न्हावेली, पिळणी, उमगाव, वाघोत्रे, जलुगडे, पार्ले, कळसगादे, गूळंब, कलिवडे, किटवडे, कोदाळी, कोलिक, म्हाळुगे खालसा, हाजगोळी, जंगमहट्टी, माडवळे या गावांचा समावेश आहे. या वनक्षेत्राला या 'वन्यजीव संरक्षण कायदा १ ९ ७२ अंतर्गत संरक्षण मिळाले आहे.
1 comment:
Sir.. जेलुगडे लिहा...
Post a Comment