लकिकट्टे तलावात बुडालेल्या "त्या" युवकाचा मृतदेह सापडला - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2021

लकिकट्टे तलावात बुडालेल्या "त्या" युवकाचा मृतदेह सापडला


लक्कीकट्टे तलावात सुरजचा मृतदेह शोधताना. इनसेटमध्ये सुरज.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       माणगाव (ता. चंदगड) येथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्कीकट्टे तलावात काल बूडालेल्या सुरज दत्तू चिंचणगी (वय वर्षे -२१) या यूवकाचा मृतदेह आज पावणे आकरा वाजता मिळाला. शिवाजी चिंचणगी व पांडूरंग चिंचणगी या दोघांनी मयत सूरज याचा मृतदेह चोवीस तासांनी  शोधून काढला.

       सुरज चिंचणगी हा काल दि २७ रोजी सकाळी अकरा वाजता  मित्रासोबत लकिकट्टे तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात दमछाक झाल्याने सूरजचा बुडून दुर्देवी अंत झाला. मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न  केला, पण तेही पोहण्यामध्ये तरबेज नसत्याने प्रयत्न व्यर्थ ठरले. यानंतर माणगाव ग्रामस्थांबरोबरच चंदगडच्या रेस्कू टिमनेही सुरजचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवले. पण त्यांनाही यश मिळाले नाही. अंधार झाल्याने गुरुवारी सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले. आज शुक्रवारी पुन्हा  शोधमोहिम राबविण्यात आली. मृतदेह शोधण्यासाठी बेळगाव व कोल्हापूर येथून पाणबूड्या पाचारण करण्यात आल्या होत्या. परंतु निम्या अंतरावर असतानाच शिवाजी चिंचणगी व पांडूरंग चिंचणगी या दोघा पोहणाऱ्यां नागरिकांनी अथक प्रयत्न करून सुरजचा मृतदेह सकाळी ११ वाजता पाण्यातून शोधून बाहेर काढला. त्यामुळे त्यांना अर्ध्या वाटेवरुनच माघारी पाठविण्यात आले. यावेळी माणगाव पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. घटनास्थळी हवालदार केसरकर,  कॉन्स्टेबल  कुशाल शिंदे, अमर सायेकर यांनी  भेट देवून पंचनामा केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. चव्हाण करत आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या  ताब्यात देण्यात आला. त्याच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ  व्यक्त होत आहे. No comments:

Post a Comment